esakal | 'दबावाच्या राजकारणाला भीक घालणार नाही, भाजप बँक निवडणूक लढवणार' I BJP
sakal

बोलून बातमी शोधा

BJP
आजपर्यंत जिल्हा बँक ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.

'दबावाच्या राजकारणाला भीक घालणार नाही, भाजप बँक निवडणूक लढवणार'

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी (Bank Election 2021) भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) माध्यमातून खटाव तालुक्यात विकास सोसायटी मतदार संघातून (Khatav Taluka Constituency) निवडणूक लढविणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण (BJP leader Dhananjay Chavan) यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी शहराध्यक्ष प्रदीप शेटे, सोसायटीचे उपाध्यक्ष मोहनराव बागल, तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंत इनामदार, ग्रामपंचायतीचे सदस्य किरण चव्हाण, धनाजी चव्हाण, चंद्रकांत तांबे, विकास बरकडे, विवेक इनामदार आदी उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, आजपर्यंत जिल्हा बँक ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ठराविक लोकांना जवळ धरून बँकेची निवडणूक पार पाडली जात होती. मात्र, आता सर्वसामान्य मतदारांमध्ये चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी बँकेला उमेदवारी करण्यासंदर्भात आपणास आग्रह केला आहे. पक्ष, संघटना व आपल्या वैयक्तीक संपर्कातील २५ ते ३० मते आहेत. सद्यस्थितीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील पक्षांतर्गत नाराजी व मत विभागणीचा फायदा घेत आपण विजयी होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: प्रियकरासोबत आईचं 'सैराट' पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच 'संसार'

जिल्हा पातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली चालल्या आहेत, त्यावेळी आपली भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चव्हाण म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत खटाव-माणची निवडणूक बिनविरोध होणार नाही. तसेच समोर कोणीही मातब्बर उमेदवार असला, तरी आपण निवडणुकीतून हटणार नाही. साटेलोटे व दबावाच्या राजकारणालाही आपण भिक घालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: न केलेल्या कामाचं श्रेय लाटणं बंद करा; सेनेच्या आमदाराला NCP चं प्रत्युत्तर

loading image
go to top