UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर I Apala Mishra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apala Mishra

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे अपालानं दाखवून दिलंय.

UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे अपालानं दाखवून दिलंय. गाझियाबादची रहिवासी असलेली डॉ. अपाला मिश्रा (Dr. Apala Mishra) ही गेल्या काही दिवसांत प्रत्येकाची Idol बनलीय. यूपीएससी परीक्षेत 9 वा रँक मिळवणाऱ्या अपालानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय, की आत्मविश्वासानं तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता, असं तिनं दाखवून दिलंय. अपालानं नागरी सेवा परीक्षेत विक्रम केला असून जरी तीला 9 वी रँक मिळाली असली, तरी तीला मुलाखतीत सर्वाधिक गुण मिळाले आहेत. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेतील मुलाखतीत (UPSC Interview) आतापर्यंत सर्वाधिक 212 गुण मिळवण्याचा विक्रम आहे. मात्र, डॉ. अपालानं हा विक्रम मोडीत काढत मुलाखत फेरीत 215 गुण मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तीच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतंय.

हेही वाचा: IBPS मध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

या यशानंतर डॉ. अपाला म्हणाली, 40 मिनिटांच्या मुलाखतीत तीनं सर्व प्रकारच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली. मुलाखतीची फेरी सुरू होण्यापूर्वी ती थोडा घाबरली होती, असं तिनं सांगितलं. पण, मनात आत्मविश्वास बाळगून मी प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं आणि यात मला यश प्राप्त करता आलं. त्यानंतर तीनं व्यक्तिमत्त्वाच्या कौशल्यांची चाचणीही पूर्ण केली. मला मुलाखतीत सुरुवातीला पहिला प्रश्न विचारला गेला, की 'अपाला' नावाचा अर्थ काय? यावर ती म्हणाली, रुग्वेदिक पीरिड्समध्ये जिनं स्त्रीयांच्या रचनेत विविध बदल केलेत, ती खुद्द एक महिलांची ऋषी होती, तीच्या नावावरुन हे नाव ठेवलं गेलंय, जीचा स्त्रीयांच्या योगदानात मोलाचा वाटा आहे, असं तिनं सांगितलं.

हेही वाचा: Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

अपालाची आई अल्पना मिश्रा म्हणाल्या, एक वर्षापूर्वी तिनं तिच्या खोलीत 'I will be under 50' नावाचं पोस्टर लावलं होतं. आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी तिनं हे पोस्टर रात्रंदिवस डोळ्यासमोर ठेवलं. याशिवाय, अपालाचे वडील अमिताभ मिश्रा म्हणाले, मी लष्करात कर्नल असून अपालाला सैन्याविषयीही धडे दिले आहेत. 8 ते 10 तास अभ्यास केल्यानंतर अपाला दररोज 30 ते 40 मिनिटे माझ्यासोबत टेबल टेनिस खेळायची, त्यामुळे अभ्यासाचा दबाव थोडा कमी व्हायचा, असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Dr. Apala Mishra