राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला डावललं

शंभूराज देसाई जिल्हा बँकेची निवडणूक लढणार; साताऱ्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात
Satara Bank Election
Satara Bank Electionesakal
Updated on

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara Bank Election) याद्यांचा आम्ही अभ्यास केला असून बँकेची निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर आम्ही रिंगणात उतरणार आहोत, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आता शिवसेनेनेही (Shivsena) जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.

Summary

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षीय राजकारणात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष या निवडणुकीत एकत्र दिसणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेवर जाण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माणचे नेते शेखर गोरे हे इच्छुक आहेत. कालच भाजपच्या अतुल भोसले (BJP Atul Bhosale) यांनी देखील निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिल्याने यंदा बँकेची निवडणूक चुरशीची होणार आहे.

Satara Bank Election
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार

याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या याद्यांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. बँकेची निवडणूक लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला, तर आम्ही रिंगणात आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुळात मागील निवडणुकीत मंत्री देसाई यांना जिल्हा बँकेवर संचालक म्हणून घेण्याबाबतचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता शिवसेनेनेही बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलीय. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढली गेली नाही, तर जिल्हा बँकेत दोन पॅनेल पहायला मिळणार आहेत. त्यामुळे यंदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhopte Hits Back at BJP Corporators, Calls for Accountability on Development Works
Karad Civic Administration Under Scrutiny as Monthly General Meetings Remain Pending
FDA and Rural Police Crack Down on Chemical Milk Production Unit in Phaltan
Quick Thinking by Off-Duty Police Officer Prevents Tragedy on Krishna Bridge
Marathi News Esakal
www.esakal.com