esakal | भाजपला मोठा धक्का; शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा 200 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर (Shashikant Waikar) यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे 'घड्याळ' हाती बांधलेय.

शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा 200 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : परळी खोऱ्यात राष्‍ट्रवादीने (NCP) आयोजिलेल्‍या मेळाव्‍यामुळे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांच्‍यातील राजकारण शिगेला पोचलेय. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या शशिकांत वाईकर (Shashikant Waikar) यांनी तब्बल 200 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे 'घड्याळ' हाती बांधलेय. त्यामुळे हा शिवेंद्रसिंहराजेंसह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार शशिकांत शिंदे व दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भोंदवडे या गावात पार पडलेल्या मेळाव्यात हा प्रवेश घेण्यात आल्याने परळी भागातील राजकीय समीकरण चांगलेच ढवळून निघालेय. या प्रवेशामुळे शिवेंद्रसिंहराजे यांची एक हाती सत्ता असणाऱ्या या भागात आता समोर शशिकांत वाईकर यांच्यासारखा तरुण चेहरा विरोधक म्हणून उभा राहिल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

हेही वाचा: टेंडरसाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना परळीत थारा नाही

मात्र, या प्रवेशावर शिवेंद्रसिंहराजे समर्थक व पंचायत समितीचे (Panchayat Committee) उपसभापती अरविंद जाधव यांनी वाईकरांवर टीका केलीय. टेंडरसाठी राजकारणात शिरलेल्या ठेकेदारांना परळी भाग कधीही थारा देणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत ठेकेदारांना राष्ट्रवादीत का घ्यायचे याचा विचार पक्षाने करण्‍याची गरज असल्‍याचेही त्यांनी मत व्‍यक्‍त केलेय.

loading image
go to top