सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्‍यात माहीर

मर्जीतल्या ठेकेदारांचे खिसे भरून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग
Udayanraje-Shivendrasinhraje
Udayanraje-Shivendrasinhrajeesakal
Updated on

सातारा : विकास होईल, या अपेक्षेने पालिकेची (Satara Municipality) एकहाती सोपविणाऱ्या सातारकरांचा अपेक्षाभंग झाला असून पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याचे प्रकार सातारकरांनी पाहिले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले असून निवडणुकीच्‍या तोंडावर विकासकामांचा पाऊस पाडण्‍याचा प्रयत्न ते करत आहेत. दिशाभूल करणारे सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांनी निवेदनाव्‍दारे केली आहे. याच निवेदनात त्‍यांनी पालिकेतील 'कचरा' हद्दपार करण्याची वेळ आल्‍याचे वक्‍तव्‍यही केले आहे. दरम्यान, त्यांनी अप्रत्यक्षपणे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय.

Summary

भ्रष्टाचार खपवून घेत नसल्‍याचा ढोल बडवत पालिकेतील भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा नेत्‍यांनी केलाय.

श्री. भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्‍हटले आहे की, गेल्या साडेचार-पावणेपाच वर्षांत सातारा पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये टेंडर, टक्केवारीसाठी लागलेली कळवंड सगळ्यांनी पाहिली आहे. या कळवंडीवर साविआच्‍या नेत्‍यांनी पडदा टाकण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न अनेक वेळा केला आहे. भ्रष्टाचार खपवून घेत नसल्‍याचा ढोल बडवत पालिकेतील भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा नेत्‍यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले असून त्‍यांच्‍यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.

Udayanraje-Shivendrasinhraje
जिल्हा बॅंकेसाठी 'राष्ट्रवादी'चा मास्टर प्लॅन

प्रभाग रचनेची सूचना प्रसिध्‍द होताच विकासकामांचे आकडे नाचवत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना भुलवण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेची सूचना लांबली असती तर कथित विकासकामांचा पाऊसही लांबला असता, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी निवेदनात केली आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रत्‍येक कामात दलाली, टक्केवारी माजली असून प्रत्‍येक प्रकल्‍पात भ्रष्‍टाचार केला आहे. हद्दवाढ होऊन वर्ष झाले तरी सत्ताधाऱ्यांनी त्‍या भागात एकही काम केलेले नाही. कोरोना काळात विलगीकरण कक्ष सुरू न करता सत्ताधारी आता विकासकामांचा ढोल वाजवत आहेत.

Udayanraje-Shivendrasinhraje
'सन्मानानं 1-2 जागा द्या, अन्यथा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल'

सत्ताधारी नगरसेवक आणि मर्जीतल्या ठेकेदारांचे खिसे भरून स्वतःची तुंबडी भरण्याचा उद्योग यापुढे होणार नाही, याची दक्षता सत्ताधारी नेत्यांनी घ्यावी.

-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rural Girl Reaches New Heights; Sai Patil Earns Prestigious Position in Air Force
Tourism and Connectivity Boost: Iconic Cable-Stayed Bridge to Open After Monsoon
Two 17-Year-Old Students Die in Hit-and-Run Accident Near Shirwal
Indefinite Dharna by Tarali Dam Victims; Administration Faces Growing Pressure
Marathi News Esakal
www.esakal.com