

Political leaders during a meeting amid rising party switching in Satara district.
Sakal
सातारा : जिल्हा परिषदेचा गट जिंकण्यासाठी सध्या जिल्ह्यात बेरजेच्या राजकारणाला वेग आला आहे. यातून त्या- त्या तालुक्यातील अडचणीचे गट सेफ करण्यावर जिल्ह्यातील नेते भर देऊ लागले आहेत. यातून अनेक जण भाजपच्या गळाला लागले आहेत. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नेत्यांनीही इतर पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेण्यास सुरुवात केली आहे. आलेल्या संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे सत्र जिल्ह्यात वाढले आहे.