
पाटण : ज्या विश्वासाने आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. सामान्य जनतेसाठी सरकारच्या योजना राबविणारा हा एकमेव पक्ष आहे. सातारा जिल्ह्यातील व पाटण मतदारसंघातील जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आपण पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे सर्व प्रलंबित प्रश्नांना केंद्रीय व राज्याचे नेतृत्व आपल्यासह सोबत येणाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व्यक्त केला.