कऱ्हाड - कऱ्हाड शहराच्या विकासासाठी समाजकारण, राजकारण करणाऱ्या जाधव गटाला आम्ही कधीही सोबत घ्यायला तयार आहोत. त्यांनी लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहान कऱ्हाड दक्षिणचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले व कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केले. जाहीर कार्यक्रमात भाजपच्या जिल्हाध्यक्षांचीच जाधव गटाच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर मिळाल्याने त्याची शहरात चर्चा आहे.