Dnyandev Ranjane addressing media while launching a scathing attack on Shashikant Shinde’s political record.Sakal
सातारा
Satara Politics: जनता शशिकांत शिंदेंच्या भूलथापांना भूलणार नाही: ज्ञानदेव रांजणेंची टीका; मंत्री असताना काय केले?
Dnyandev Ranjane Slams Shashikant Shinde: कोरेगावला गेल्यानंतर जावळीतील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आता पुळका आल्याचा आव आणत आहात. मात्र, आमचे नेते शिवेंद्रसिंहराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बोंडारवाडी धरणाला मंजुरी दिली असून, थोड्या दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
केळघर: दहा वर्षे जावळीचे आमदार होता. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद तसेच जलसंपदामंत्री असतानाही तुम्ही बोंडारवाडी धरणासाठी चकार शब्दसुद्धा काढला नाहीत. आता मोठेपणा दाखविण्यासाठी बोंडारवाडी धरण मी केले असते, असे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करत आहात; परंतु तुमच्या या भूलथापांना जावळीची जनता भूलणार नाही.

