Supriya Sule
esakal
कऱ्हाड (सातारा) : कोणाच्यातरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. अशा गुन्हेगारांना मदत करण्याची प्रवृत्ती कोणत्याही पक्षात किंवा नेत्यांमध्ये आढळली, तर त्याचा जाहीर निषेध करायला हवा आणि त्यांना तत्काळ पक्षाबाहेर काढले पाहिजे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) केली. माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात बोलत होत्या.