जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली. अतिशय मोहक आणि दर्जेदार फळ त्यांच्या बागेला लागले. त्यामुळे परराज्यातून व्यापारी त्यांच्या शेतात पोचले.
दुधेबावी : फलटण तालुक्यातील बोडकेवाडी (Bodkewadi Phaltan) येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला जागेवर २२४ रुपयांचा भाव मिळाला असून, तो सध्या राज्यात विक्रमी आहे. या उच्च दरामुळे डाळिंब (Pomegranate) उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच या फळाला इतका उच्च दर मिळाला आहे.