Umbraj Gram Panchayat
Umbraj Gram Panchayatesakal

उंब्रज ग्रामपंचायतीचा 'महावितरण'ला जोर का झटका; वीज तोडल्याने संताप

कऱ्हाड (सातारा) : गावोगावी थकीत वीजबिलांमुळे ‘महावितरण’ने (MSEDCL) पथदिव्यांचा विद्युत पुरवठा (Power supply of street lights) सर्रास तोडण्याचा सपाटा लावलेला असताना आता ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) सरपंचांनी आमच्या हद्दीत ‘महावितरण’चे खांब, ट्रान्‍स्‍फॉर्मर आहेत. त्याचे भाडे ‘महावितरण’ने ग्रामपंचायतींना अदा करावे, अशी मागणी करायला सुरवात केली असून, त्यातून आता ग्रामपंचायत पदाधिकारी व महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) यांच्यात संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचा श्रीगणेशा उंब्रज ग्रामपंचायतीने केला असल्याचे दिसत आहे. या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयांच्‍या प्रवेशद्वारासमोर चर खोदून प्रवेशद्वाराला कुलूप लावत नळकनेक्शन बंद केले आहे. (Possibility Of Dispute Between Umbraj Gram Panchayat And MSEDCL Satara Marathi News)

Summary

गावोगावच्या रस्त्यावर उजेड पडून लोकांची सोय व्हावी, गावांच्या वैभवात भर पडावी, या हेतूने शासनाने पथदिव्यांची योजना आणली.

गावोगावच्या रस्त्यावर उजेड पडून लोकांची सोय व्हावी, गावांच्या वैभवात भर पडावी, या हेतूने शासनाने पथदिव्यांची योजना आणली. त्यासाठी शासनाने निधी दिला. त्यानंतर वीजबिलही शासनच भरत होते. त्यापोटी ग्रामस्थांकडून दिवाबत्ती कर वसूल केला जातो. ही अनेक वर्षांची रीत कायम होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोविडमुळे पथदिव्यांची वीजबिले थकली. सरकारने ती बिले भरली नाहीत. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यातच महावितरणनेही बाकी वाढल्याने पथदिव्यांची वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावे अंधारात आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या हद्दीत महावितरणचे खांब, ट्रान्‍स्‍फॉर्मर आहेत. त्याचे भाडे महावितरणने ग्रामपंचायतींना अदा करावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे.

Umbraj Gram Panchayat
बंडातात्यांवर कारवाई नकाे; 500 वारक-यांना परवानगी द्या

त्यामुळे आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा महावितरणबरोबर संघर्ष सुरू झाला आहे. त्याचा श्रीगणेशा काल उंब्रज येथून झाला. उंब्रज येथील ग्रामपंचायत पथदिव्यांच्या बिलाची रक्कम थकीत असल्याने महावितरणने पथदिव्यांचे कनेक्शन अचानक बंद केले. यावरून ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेत वीज वितरण कार्यालयालाही चांगलाच हिसका दाखवला. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने वीज वितरणच्या प्रवेशद्वारासमोर चर खोदून प्रवेशद्वाराला कुलूप लावत नळकनेक्शन बंद केले. त्यावरून जोरदार वादावादीही झाली. त्याचे लोण आता जिल्हाभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याअगोदरच यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

Umbraj Gram Panchayat
अफजल खानच्या वधानंतर शिवरायांनी ताब्यात घेतला : सदाशिवगड

घरगुती कनेक्शनलाही झटका

महावितरणपुढे थकीत वीजबिलाचा डोंगर आहे. त्यातून सावरण्यासाठी आता महावितरणने वीज कनेक्शन तोडून नाक दाबण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत अनेक घरांतील वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक घरांतही अंधार पसरला आहे.

Possibility Of Dispute Between Umbraj Gram Panchayat And MSEDCL Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com