

Members of the Sawant family from Ambhrulkarwadi after Aparna’s noble eye donation, inspiring society.
Sakal
ढेबेवाडी : ‘मरावे परि नेत्ररूपी उरावे’ याचे प्रत्यंतर देणारी घटना नुकतीच घडली. मूळच्या आंब्रुळकरवाडी (ता. पाटण) गावच्या; परंतु मानखुर्द (मुंबई) येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या अपर्णा रघुनाथ सावंत (वय ४१) यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक जाणिवेतून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करून दोन अंध व्यक्तींना नवीन दृष्टी दिली.