
दिल्ली सर्कलप्रमाणे वितरण विभागात सम व विषम पद्धतीने कामाचा फॉर्म्युला ठरवावा. त्वरित रोस्टर ड्युटी सुरू करावी. 2015-16, 16-17 व 2017-18 या कालावधीतील ओपन मार्केट कोट्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भराव्यात. सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी घेण्यात येणारे कार्यक्रम, आयपीपीबीचे खाते व एईपीएसईच्या नावावर कामगारांवर केली जाणारी सक्ती त्वरित बंद करावी या आदी मागण्या सातारा टपाल कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
सातारा : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, पोस्टमन व एमटीएस महाराष्ट्र-गोवा सर्कलमधील ओपन मार्केट कोट्यातील जागा तत्काळ भरा व इतर मागण्यांसाठी सातारा टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदविला.
दिल्ली सर्कलप्रमाणे वितरण विभागात सम व विषम पद्धतीने कामाचा फॉर्म्युला ठरवावा. त्वरित रोस्टर ड्युटी सुरू करावी. 2015-16, 16-17 व 2017-18 या कालावधीतील ओपन मार्केट कोट्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरा. सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी घेण्यात येणारे कार्यक्रम, आयपीपीबीचे खाते व एईपीएसईच्या नावावर कामगारांवर केली जाणारी सक्ती त्वरित बंद करावी.
पोस्ट कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनाने नागरिक वैतागले!
लॉकडाउन काळातील गैरहजेरीचा कालावधी कामगारांच्या वैयक्तिक सुटी गृहीत धरू नये. पोस्टमन व एमटीएस केडर 38 अंतर्गत बदलीच्या ऑर्डर त्वरित प्रसिद्ध कराव्यात. आऊट सायडर पोस्टल एजंट योजना त्वरित बंद करावी या मागण्या मंजूर करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करत आहे. मात्र, 14 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राज्यव्यापी संप करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे