मायणी : 125 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; पाच लाखांच्या वसुलीस यश

मायणी : 125 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; पाच लाखांच्या वसुलीस यश
Updated on

मायणी (जि. सातारा) : एक मार्च 2020 पासून थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून, महावितरणच्या विशेष वसुली पथकाच्या धडक कारवाईला ग्राहक उत्तम प्रतिसाद देत आहेत. येथे एका दिवसात 100 ते 125 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, सुमारे पाच लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता (वडूज) राजकुमार कलशेट्टी यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. तेव्हापासून अनेक ग्राहकांनी वीज देयके भरली नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत राहिली. अशा ग्राहकांना वीजबिले भरण्यासंदर्भात गेल्या फेब्रुवारीमध्ये सूचना देण्यात आलेल्या होत्या. ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिले भरण्यासाठी हप्ते बांधून देण्यात आले होते. मात्र, तरीही वीजबिले भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 
त्या मोहिमेंतर्गत ग्राहकांच्या घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निवारण करून वीजबिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस शनिवार-रविवारी सुटी असूनही वीजबिले भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतीपंप मालकांनी बिले भरून शासनाच्या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. 

अशी भरुन घ्या वीजबिलांची थकबाकी; उदयनराजेंचा MSEB ला सल्ला

दरम्यान, येथे एकाच दिवसात 100 ते 125 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, सुमारे पाच लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर बिल भरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे श्री. कलशेट्टी यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी बिले भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

बिल वसुली पथक... 

बिल वसुली पथकामध्ये श्री. कलशेट्टी, मायणीचे सहायक अभियंता विशाल नाटकर, माधवी गायकवाड, संतोष भोसले, राजेंद्र मोरे, उच्चस्तर संतोष शिंदे, भारत भोजने, ज्ञानेश्वर दोडके आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत घरोघरी भेट देऊन वीजबिलांची वसुली करत आहे. 

सातारकरांनाे! सावधान जंबाे हाॅस्पिटलचे आयसीयू झाले फुल्ल

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com