

Electrical Safety Ignored Despite Repeated Warnings; Time to Rein in the System
sakal
-संजय शिंदे
माण तालुक्यातील मार्डी येथे विजेच्या धक्क्याने आजी व नातवाचा झालेला मृत्यू ही केवळ दुर्दैवी घटना नसून ग्रामीण व दुर्गम भागातील वीज सुरक्षेच्या गंभीर प्रश्नावर बोट ठेवणारी आहे. दोन निष्पापांचा बळी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रशासन पंचनामा, चौकशी आणि मदतीच्या घोषणा करेल. मदतही मिळेल. मात्र, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या त्रुटींवर कठोर कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी वीजतार तुटल्याची माहिती निर्ढावलेल्या यंत्रणेला सांगूनही दुर्लक्ष केल्यामुळे घडलेली दुर्घटना दुर्दैवी आणि चीड आणणारी आहे.