

New Chapter in Satara Politics as BJP Eyes Control of Zilla Parishad
Sakal
-प्रशांत घाडगे
सातारा: जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठता न आल्याची खंत भाजपला आहे. तरी देखील झेडपी अध्यक्ष भाजपचाच होणार, अशी आरोळी भाजपने ठोकल्याने राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेही सावध पवित्रा घेत राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगत भाजपला झुलवत ठेवले आहे. त्यामुळे राजकारणाच्या रणांगणात सत्तेसाठी सौदेबाजी होत सदस्यांची फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीच्या प्रचारातील वादावर पडदा टाकून शिवसेना-भाजप एकत्र येणार, की भाजपला हिसका धाकवत शिवसेना-राष्ट्रवादी झेडपीत सत्तेचा नवा अध्याय सुरू करणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.