अडीच हजार शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electricity continue

कऱ्हाड : अडीच हजार शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत

कऱ्हाड : सर्वसामान्यांच्या मुलांच्या हक्काच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील १४ कोटी १८ लाख १६ हजार २११ रुपयांचे वीजबिल थकले होते. त्यामुळे राज्यातील पाच हजार ४७७ शाळांचा तात्पुरता, तर ११ हजार ६२१ शाळांचा कायस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील २ हजार ५९४ शाळांचा समावेश आहे. शासनाने खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला १४ कोटींवर निधी दिला आहे. त्यामुळे आता सर्व जिल्हा परिषद शाळांची वीजजोडणी पूर्ववत होत आहे.

ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गावोगावी शाळा सुरू करण्यात आल्या. मोठ्या लोकसंख्‍येच्या गावात प्रामुख्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. बदलत्या काळानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांत डिजिटलचे वारे आले. त्यामुळे शाळांचे बहुतांश काम ऑनलाइन सुरू झाले आहे. कोरोनामुळे मध्यंतरीच्या दोन वर्षांत ऑनलाइन कामकाजाला मोठी गती मिळाली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्व कामकाज ऑनलाइनच सुरू होते. त्यासाठी गेल्या काही वर्षांत शाळांतून विजेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. जिल्हा परिषदेच्या शाळांना इतर खर्चासाठी निधी मिळत नाही. त्यामुळे शाळांतील वीजबिल भरायचे कशातून, हा प्रश्न शाळांसमोर होता. परिणामी, वीजबिल थकीत राहिले. त्या बिलांच्या रकमा वाढत गेल्यावर महावितरणने शाळांतील वीज कनेक्शन तोडली. वीजपुरवठा खंडित झाल्याने शाळा अंधारात जाऊन तेथील ऑनलाइनचे कामकाजही ठप्प झाले. त्यामुळे शाळांची घडीही विस्कटली होती.

राज्यातील ११ हजार ६२१ शाळांची सहा कोटी ७८ लाख १६ हजार २२१ रुपये थकबाकी होती. त्यामुळे त्या शाळांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्यातील पाच हजार ४७७ शाळांची सात कोटी ३९ लाख ९९ हजार ९९० रुपयांची थकबाकी होती. त्या शाळांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता. संबंधित १७ हजार ९८ शाळांची १४ कोटी १८ लाख १६ हजार २२१ रुपयांची वीजबिलाची थकबाकी होती. राज्य सरकारने ती थकबाकी भरण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली. त्यामुळे राज्यातील १७ हजार ९८ जिल्हा परिषद शाळांतील वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळांत वीजपुरवठा सुरू झाल्याने आता ऑनलाइन कामकाजाला गती येणार आहे.

सरकारने वीजबिलाची रक्कम महावितरणला अदा केली आहे. त्याचा जिल्ह्यातील दोन हजार ५९४ शाळांना लाभ होणार आहे. संबंधित शाळांतील वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याने त्या शाळांतील ऑनलाइन कामजाला गती मिळणार आहे.

महाराष्ट्रातील पाच हजार ४७७ शाळांचे तात्पुरता, तर ११ हजार ६२१ शाळांतील वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. त्यांच्या वीजबिलाची १४ कोटी १८ लाख १६ हजार २२१ रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी भरण्यास शासनाने निधी दिला आहे. त्यामुळे आता शाळांतील वीजजोडणी पूर्ववत केली जात आहे.

- दिनकर टेमकर, प्राथमिक शिक्षण संचालक

आकडे बोलतात...

  • थकीत वीजबिलाची रक्कम १४ कोटी १८ लाख १६ हजार २११ रुपये

  • खंडित वीजपुरवठा केलेल्या शाळा १७ हजार ९८

  • सातारा जिल्ह्यातील शाळा २ हजार ५९४

  • शासनाकडून महावितरणला दिलेला निधी १४ कोटी

Web Title: Power Supply Schools Restored Speed Up Online Work Zilla Parishad Schools

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top