esakal | विजेचे शाॅक लागून पाचवडला वायरमनचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

विजेचे शाॅक लागून पाचवडला वायरमनचा मृत्यू

गरीब परिस्थितीमुळे हा युवक गेल्या तीन वर्षांपासून कऱ्हाडच्या ठेकेदाराकडे खासगी वायरमन म्हणून काम करत होता. त्याचे अजून लग्नही झाले नव्हते. सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. जी. हांगे तपास करत आहेत.

विजेचे शाॅक लागून पाचवडला वायरमनचा मृत्यू

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : पाचवड (ता. माण) येथे विजेचे काम करताना पोलवर चढलेल्या खासगी वायरमनचा शॉक लागून पोलवरच चिकटून मृत्यू झाला. प्रदीप जगन्नाथ खरात (वय 30, रा. तोंडले, ता. माण) असे मृताचे नाव आहे.
 
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाचवड व अनभुलेवाडी (ता. माण) येथील गावठाणाची वीज पुरवण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी दहिवडी वीज वितरण कंपनीमार्फत खासगी वायरमन प्रदीप खरात हा काम करण्यासाठी  गुरुवारी (ता.29) सकाळी दहा वाजता पाचवडमध्ये जोतिबा मंदिराच्या पाठीमागे आला होता.

शेतकऱ्यांवर रब्बीच्या दुबार पेरणीचे सावट; पावसाचा धुमाकूळ अद्याप सुरूच

गावाला पाठीमागून येणारा वीजप्रवाह बंद करून तो विजेच्या पोलवर चढला. त्याच वेळी विद्युत वाहिनीत पुन्हा प्रवाह आल्याने शॉक विजेच्या तारांत अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती चंद्रकांत जगदाळे यांनी वीज वितरण कंपनी व पोलिस प्रशासनाला दिल्या. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या दरम्यान मृत युवकाच्या नातेवाइकांनी कंपनीचे अधिकारी व संबंधित ठेकेदार आल्याशिवाय मृतदेह पोलवरून खाली घेण्यास नकार दिला; परंतु पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांनी ठेकेदार व नातेवाईकांच्यात समन्वय साधून पोलवरून मृतदेह खाली घेऊन पंचनामा केला. या वेळी वीज वितरणचे रणजित देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.

कऱ्हाडला बंद खोकी, हातगाडे जप्त; पालिकेची जोरदार मोहीम

गरीब परिस्थितीमुळे हा युवक गेल्या तीन वर्षांपासून कऱ्हाडच्या ठेकेदाराकडे खासगी वायरमन म्हणून काम करत होता. त्याचे अजून लग्नही झाले नव्हते. सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. जी. हांगे तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

loading image