
सातारा : पीपल्स रिपब्लिकन पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाला आज प्रहार अपंग क्रांती आंदोलनासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला, तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्ह्यातील ठेकेदारांची बिले लवकरात लवकर काढावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे.