खटावची मान प्राजक्ताने दिल्ली तख्तावर उंचावली

Prajakta Panskar from Suryachiwadi has secured the post of Nursing Officer of All India Institute of Medical Sciences..jpg
Prajakta Panskar from Suryachiwadi has secured the post of Nursing Officer of All India Institute of Medical Sciences..jpg

निमसोड (सातारा) : अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जाणारा खटाव तालुका हा बुद्धिवंताची खाण आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परिश्रमाने यशाच्या शिखरावर पोहचता येते, हे प्राजक्ता पानस्कर हिने सिद्ध केले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये तिची निवड झाल्याने खटाव तालुक्‍याची मान दिल्लीच्या तख्तावर उंचावली असल्याचे गौरवोद्गगार हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी काढले. 

सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील प्राजक्ता दत्तात्रय पानस्कर हिने पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या नर्सिंग ऑफिसरपदाला गवसणी घातली आहे. 98.45 टक्के गुण मिळवून देशात 1514 वी रॅंक मिळवल्याबद्दल तिचा हरणाई उद्योग समूहाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिषेक रावत, दत्ता कदम, रामभाऊ घोलप, संजय घाडगे, दत्तात्रय पानस्कर, रमेश भोसले, अमृत मट्टकली आदींची उपस्थिती होती.
 
प्राजक्ता पानस्कर म्हणाली, आपल्या मातीतील हा सत्कार निश्‍चितच प्रेरणादायी ठरला आहे. माझ्यासारख्या अनेक क्षेत्रात यशस्वी झालेल्या युवक व युवतींनी पुढील पिढीस मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी भैय्यासाहेबांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी सयाजी सुर्वे, गुलाबराव जगदाळे, एस. एम. गायकवाड, सुनील माने, अशोक सुर्वे, विनोद जगदाळे आदींसह सूतगिरणी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. नीलेश घार्गे यांनी आभार मानले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com