esakal | ई-पीक अॅपसाठी प्रांताधिकारी थेट बांधावर; शेतकऱ्यांशी साधला संवाद । EPik
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक अॅपसाठी प्रांताधिकारी थेट बांधावर; शेतकऱ्यांशी साधला संवाद

ई-पीक अॅपसाठी प्रांताधिकारी थेट बांधावर; शेतकऱ्यांशी साधला संवाद

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : ई-पीक पाहणी अॅपबाबत जागृतीसाठी प्रांताधिकारी सुनील गाढे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शासनाने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणी करावी, यासाठी प्रांताधिकारी गाढे यांनी विभागातील देशमुखवाडी व हुंबरळी येथील स्थानिक शेतकरी यांच्या थेट बांधावर जावून भेट घेतली. यावेळी पिक पाहणी अॅप वरच्या नोंदीचे प्रात्यक्षिक दाखवले.

हेही वाचा: औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

तालुक्यातील ई पीक पाहणीचे काम इंटरनेटची अनियमित उपलबद्धतेने कमी झाले आहे. त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना गाढे यांनी केल्या. तालुक्यातील अधिकाअधिक शेतकऱ्यांनी ई पीक पहाणीच्या नोंदी कराव्यात. काही तांत्रिक अडचणी असल्यास थेट संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी गाढे यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार योगेश्वर टोम्पे, नूतन तहसीलदार रमेश पाटील, तलाठी रमेश टिपुगडे, पोलीस पाटील महेंद्र देसाई, बाळा चाळके उपस्थीत होते.

loading image
go to top