शिक्षक समितीने केल्या प्राथमिक शिक्षक बॅंकेकडे 'या' मागण्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

शिक्षक समितीच्या संचालकांनी व्याजदर कमी करावे, असे निवेदन बॅंकेला दिले होते. त्यावरून बॅंकेने ओव्हरड्राफ्ट कर्ज व्याजदरात एक टक्के कपात केली. सभासदांच्या बॅंक व्यवहाराबाबत असलेल्या इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सभासद हिताच्या मागण्या समितीने केल्या होत्या

सातारा : अंशदायी पेन्शन योजनेतून शिक्षक सभासदांना मयत कर्ज निवारण निधी, सभासद कल्याण निधी, अपघाती मृत्यू व इतर प्रकारे शिक्षक बॅंकेकडून मदत दिली जाते. या मदतीच्या रकमेत वाढ करून ती अंशदान पेन्शन योजनेतील सभासदांना पाच लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करावी, अशी मागणी शिक्षक बॅंकेचे शिक्षक समितीचे संचालक किरण यादव, सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे व शिवाजी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी
 
निवेदनात श्री. यादव, श्री. शेवाळे, श्री. मोरे व शिंदे यांनी म्हटले, की जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या वतीने सभासदांना मयत कर्ज निवारण निधी, सेवक कल्याण निधी, अपघात मदत व तातडीची मदत केली जाते. आता नव्यानेच सेवेतील सभासदांसाठी कुटुंब कल्याण योजना सुरू केली आहे. त्यासाठी सभासदांच्या खात्यातून कायम ठेव, कल्याण निधी व सेवेतील सभासदांसाठी कुटुंब कल्याण योजनेसाठी म्हणून 600 रुपयांची कपात केली जाते. ही बाब लक्षात घेता सभासदांकडून कपात केलेल्या रकमेच्या तुलनेत सभासदांना मदत म्हणून मिळणारी रक्कम कमी आहे. सध्या केवळ पाच लाख रुपयांची मदत केली जाते. ही रक्कम वाढवून 20 लाख रुपये करावी, अशी मागणी शिक्षक समितीच्या संचालकांनी केली आहे.

शिक्षक समितीच्या संचालकांनी व्याजदर कमी करावे, असे निवेदन बॅंकेला दिले होते. त्यावरून बॅंकेने ओव्हरड्राफ्ट कर्ज व्याजदरात एक टक्के कपात केली. सभासदांच्या बॅंक व्यवहाराबाबत असलेल्या इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सभासद हिताच्या मागण्या समितीने केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत संचालक श्री. यादव, श्री. शेवाळे, श्री. मोरे व श्री. शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

बेंदूर सणासाठी बैल खरेदीस गर्दी, पण सजावट साहित्याला मागणी कमी 

कोरोनायोद्धा बनून हे करताहेत आरोग्य खात्याला मदत 

मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतू लागल्याने माणदेशात सामान्यांना भरली धडकी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prarthmik Shikshak Bank Samiti Directors Demands