esakal | अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी

यासंबंधीचा प्रस्ताव उद्या (तीन जुलैला) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथे मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यास मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

अजित पवारांचे खटक्याव बाेट जाग्यावर पलटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णनगर परिसरातील 64 एकर जागा देण्यात यावी, त्याबदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी, असा निर्णय आज विधान परिषद सभापतींच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य यंत्रणेचा उपयोग करुन पुढील शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. 
 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले 'माेदीं"चे पेढे 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील त्यांच्या दालनात सातारा वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसंदर्भात आज (गुरुवार) बैठक झाली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, वित्त, वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.
 
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यात 419 कोटी खर्चाचे शंभर खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र, ते कागदोपत्रीच राहिले होते. सातारा शहरवासियांची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार आज (गुरुवार) बैठक झाली. बैठकीत कृष्णनगर येथील जलसंपदा विभागाची 64 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा निर्णय झाला. बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्या (तीन जुलैला) नियामक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. तिथे मंजूर झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यास मान्यता घेण्यात येणार आहे. यामुळे हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
साताऱ्यात एकच दिवस अजित पवार आले अन्...
 
अजित पवार म्हणाले, नवीन जागेवर उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि परिसर हा पुढील शंभर वर्षांचा विचार करुन विकसित करावा. सर्व बांधकामे कलात्मक, दर्जैदार असावीत. गरज पडल्यास नामवंत तज्ञांचा सल्ला, मदत घ्यावी. इमारतीची कलात्मकता, उपयोगिता आणि दर्जात तडजोड करु नये. महाविद्यालयाबाहेरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, रेल्वेस्टेशन व एसटी स्टॅन्डकडून येणाऱ्या नागरिकांची सोय लक्षात घेऊन रस्त्यांची सुधारणा व्हावी, अशी सूचना त्यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही सातारावासियांची सर्वात मोठी गरज आहे. यासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही, असा विश्वास देत श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा उपयोगात आणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साताऱ्यात 'हे' करा : अजित पवार 

उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे भेटले अन् माध्यमांनी उदयनराजेंना छेडले