Afzal Khan Tomb Pratapgad
esakal
सातारा : प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफझल खान कबरीच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ (Afzal Khan Tomb Pratapgad) नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.