
सातारा : प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘चीनने २०००मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे ज्ञान शाळेत देण्यास प्रारंभ केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. २०२५मध्ये आम्ही जगाला मागे टाकू, अमेरिकेला मागे टाकू, असे चीनने २०१७मध्ये जाहीर केले होते. आज सर्व तंत्रज्ञानात चीन पुढे आहे. त्यांची गुणवत्ता उत्तम आहे आणि किंमत निम्मी आहे. कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेला तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही.’’