

म्हसवड, ता. २९ : येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रवीण सूर्यकांत लोखंडे याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश मिळवले. त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.प्रवीण लोखंडे या युवकाने मेहनतीच्या जोरावर बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. म्हसवडमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले.