
विनोद पवार
कुसुंबी : सध्या आठवड्याभरापासून मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार सुरू केल्याने शेतकरी नव्या उत्साहाने खरीप हंगामाची तयारी करत आहेत. वेधशाळेनेही समाधानकारक पावसाचे संकेत दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरू केली असून, शिवारात बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.