
सातारा : सातारा शहर, परिसरासह जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मॉन्सूनपूर्व सरींचे धुमशान पाहायला मिळाले. साताऱ्यात सकाळी आणि सायंकाळी, तर फलटण, जावळी, खटाव, माण तालुक्यांत सायंकाळी झालेल्या या पावसाने शेतीमालासह अन्य नुकसानीचे संकटही निर्माण झाले.