खरीपपूर्व मशागती पावसामुळे रखडल्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

खरीपपूर्व मशागती पावसामुळे रखडल्‍या

पाटण - सलग पाच दिवस ढगाळ वातावरण तालुक्यात होते. गार वारा वाहत होता. मात्र, पाऊस पडेल अशी शक्यता नव्हती; परंतु काल (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास रिमझिम पावसाने सुरवात केली. रात्रभर रिमझिम पाऊस विश्रांती न घेता पडत होता. या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामे व उन्हाळी भुईमूग काढणीत व्यत्यय आला आहे.

१५ दिवसांपूर्वी वातावरणातील उष्णता वाढली होती. दिवसभर अंगाची लाहीलाही होत होती. वळिवाचा पाऊस पडेल, असे वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, पाऊस पडला नाही. गेले पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवेत गारवा व वारे वाहू लागल्याने उष्णतेचा दाह कमी झाला होता. पाऊस हुलकावणी देईल, असे वातावरण होते. त्यामुळे शेतकरी वर्गात खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ उडाली होती. खरीपपूर्व मशागतीच्या कामासह उन्हाळी भुईमूग काढणीस या पाच दिवसांत वेग आला होता. मात्र, काल सायंकाळी सातच्या सुमारास अचानक रिमझिम पावसास सुरुवात झाली.

रात्रभर रिमझिम पाऊस खंड पडू न देता पडत होता. सकाळी ११ वाजले तरी रिमझिम पावसाने विश्रांती घेतली नव्हती. यामुळे खरीपपूर्व मशागतीची कामे व उन्हाळी भुईमूग काढणीत व्यत्यय आला आहे. पावसाने उघडीप दिली तर पाच ते सात दिवसांत भुईमूग काढणी पूर्णत्वाकडे जाईल. मात्र, पावसाने उघडीप घेतली नाही तर भुईमूग काढणी रखडून बळिराजाचे नुकसान होणार आहे.

Web Title: Prekharif Cultivation Was Delayed Due To Rains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top