

Women Empowerment Stories in Indian Cricket
esakal
स्वप्नील शिंदे
सातारा, ता. ६ : भारताच्या महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबरला आयसीसी विश्वचषक उचलला तो क्षण फक्त विश्वविजयाचा क्षण उरलेला नाही. त्या क्षणापासून फक्त भारतातले क्रीडा क्षेत्र बदललेले नाही, तर महिला खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याची सुरुवात सत्तरच्या दशकात झाली. या भारतीय महिला क्रिकेट टीमला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री आणि महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण यांनी जागतिकस्तरावर पहिल्यांदा पोहोचवले.