
कऱ्हाड : शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. भोसले यांनी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले. पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करण्याची ग्वाही आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी उपस्थितांना दिली.