Shambhuraj Desai : अजित पवार म्हणाले होते, धरणात पाणी नाही तर तिथं मी काय..; देसाईंचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांकडून चुकून निवडणूक आयोग म्हटले गेले. त्याचे भांडवल करायची गरज नव्हती.
Ajit Pawar Shambhuraj Desai
Ajit Pawar Shambhuraj Desaiesakal
Summary

मीही पवारसाहेबांचे हे पुस्तक मिळवून वाचणार आहे. त्यानंतरच या पुस्तकावर टिपण्णी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा : एखादा शब्द मागे पुढे झाला, की त्यावर लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दहा महिन्यांत केलेल्या विकासकामांवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलावे.

त्रुटी राहिल्या असतील तर सांगाव्यात; पण आम्हाला कसला मुख्यमंत्री मिळालाय, दुर्दैव आहे, असे ते म्हणत असतील तर ‘धरणात पाणी नाही मग काय करू’ असे म्हणणारा उपमुख्यमंत्री मिळाला होता, असे आम्ही म्हणालो, तर ते त्यांना आवडेल का, असा खोचक प्रश्न पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला.

‘धरणात पाणी नाही तर काय करायचं’

पालकमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. एका सभेत मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) हे चुकीचे बोलले होते. त्यावर अजित पवारांनी टीका केली होती.

त्याबाबतच्या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘बोलताना ‘स्लीप ऑफ टंग’ होऊ शकते. अजित पवार म्हणाले होते, की ‘धरणात पाणी नाही तर काय करायचे’ तसेच मुख्यमंत्र्यांकडून चुकून निवडणूक आयोग म्हटले गेले. त्याचे भांडवल करायची गरज नव्हती.

Ajit Pawar Shambhuraj Desai
Karnataka Election : अण्णा हजारेंकडून घेतली प्रेरणा; पदाचा राजीनामा देत न्यायाधीश उतरले थेट रिंगणात

'मीही पवारसाहेबांचं पुस्तक मिळवून वाचणार'

लोक माझे सांगाती, या पुस्तकात पहाटेच्या शपथविधीबाबत वस्तुस्थिती काय आहे, हे लिहिले आहे. यावर अजित पवारांनी बोलावे; पण त्यांनी ते पुस्तकच वाचलेले नाही.

एखादा शब्द मागे पुढे झाला, त्यावर लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दहा महिन्यांत केलेल्या विकासकामांविषयी त्यांनी बोलावे. मीही पवारसाहेबांचे हे पुस्तक मिळवून वाचणार आहे. त्यानंतरच या पुस्तकावर टिपण्णी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar Shambhuraj Desai
Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनं खळबळ; NCP कार्यकर्त्यांत अस्‍वस्‍थता, आंदोलनाची तयारी

'संजय राऊतांनी भडकावू वक्तव्ये करून वातावरण चिघळवलं'

बारसू प्रकल्प करा, असे उद्धव ठाकरेंनीच केंद्राला पत्र दिले होते. ते पत्र ग्राह्य धरायचे, की आता आगीत तेल ओतायची भूमिका ग्राह्य धरायची, असा प्रश्न करून मंत्री देसाई म्हणाले, ‘‘त्यांची दुटप्पी भूमिका आहेत.

आंदोलकांवर लाठीचार्ज केला नसतानाही ‘जालियनवाला बाग’ असा उल्लेख खासदार संजय राऊत यांनी भडकावू वक्तव्ये करून वातावरण चिघळवले आहे.’’ पुढील मंत्रिमंडळ बैठकीत भडकावू वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar Shambhuraj Desai
Akkalkot : 'माझी ही शेवटची निवडणूक' म्हणणाऱ्या बलाढ्य नेत्याची सरशी; शिंदेंच्या पदरी 'पराभवाचं गिफ्ट'

'शिवसेना-भाजप सातारा जिल्ह्यात मजबूत करणार'

बाजार समिती निवडणुकीत सर्वाधिक यश भाजपला मिळाले असून, तीन पक्ष एकत्र असल्याने महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मुळात शिवसेना यापूर्वी सहकार क्षेत्रात कमी आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली सहकारातही शिवसेनेचा प्रभाव वाढत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीविरोधात परिवर्तन सुरू झाले आहे. आगामी काळात शिवसेना, भाजप सातारा जिल्ह्यात मजबूत करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com