esakal | जिल्ह्याबाहेरील जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नाही : सागर जाधव
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याबाहेरील जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नाही : सागर जाधव

कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रोगाच्या भीतीमुळे कर्मचारी वर्गही आता मिळणे मुश्किल बनले आहे, त्यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर अतिरिक्त ज्यादाचे काम दिले जात आहे. मात्र, कच-याचे संकलन करत असताना योग्य ती काळजी घेऊनही काही कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याकारणाने संपूर्ण स्टाफला धोका निर्माण होऊ लागला आहे, असे नेचर इन नीडने कळविले आहे.

जिल्ह्याबाहेरील जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नाही : सागर जाधव

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : कोरोना महामारीची परिस्थिती ओळखून सध्या जिल्ह्यात असणा-या रुग्णालयांमधील जैव वैद्यकीय कच-यावर नेचर इन नीड प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जात आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून प्रकल्पात जमा होणा-या जैव वैद्यकीय कच-याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, हे काम करत असताना कर्मचारी वर्ग योग्य ती काळजी घेऊन सुध्दा कळत-नकळतपणे थेट कोविड या संसर्गजन्य रोगाच्या संपर्कात येत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाकडून देखील वेळोवेळी सहकार्य केले जात असल्याचे नीडचे अधिकारी सागर जाधव यांनी सांगितले. नेचर इन नीड संस्थेस सातारा पाालिकेने नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने नेचर इन नीडने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सागर जाधव म्हणाले, मागील काही दिवसांपासून आमच्या प्रकल्पातील गाडीवरील चालक व कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबतचे काम जिकीरीचे असल्याकारणाने नवीन कर्मचारी वर्ग उपलब्ध होत नाही. त्यामुळे उर्वरित कर्मचारी वर्गावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.

सातारा पालिकेची नेचर इन नीडला पून्हा नोटीस

सध्या जे वाहन चालक कार्यरत आहेत, त्यांना कचरा वाहतुकीबाबत अतिरिक्त कचरा संकलनाचे मार्ग दिले आहेत. त्यामुळे त्यांना सकाळी लवकर सातारा शहरातील कचरा संकलनाचे काम सुरू करून, त्यानंतर ग्रामीण भागातील कचरा संकलनाचे काम करावे लागत आहे. त्यात काही गाड्यांना प्रकल्पावर येण्यास उशीर होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून याबाबत प्रशासनानेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आम्ही जिल्ह्याबाहेरील कोणताही जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना

कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रोगाच्या भीतीमुळे कर्मचारी वर्गही आता मिळणे मुश्किल बनले आहे, त्यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर अतिरिक्त ज्यादाचे काम दिले जात आहे. मात्र, कच-याचे संकलन करत असताना योग्य ती काळजी घेऊनही काही कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याकारणाने संपूर्ण स्टाफला धोका निर्माण होऊ लागला आहे. याबाबत संबंधित प्रशासनानेही थोडे लक्ष घालून हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणीही नीडच्या जाधव यांनी पत्रकाव्दारे केली आहे.

loading image
go to top