esakal | झेंडूचा दर बहरला; परतीचा पावसाचा ग्राहकांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडूचा दर बहरला; परतीचा पावसाचा ग्राहकांना फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत साजरा होत असलेल्या दसऱ्याला विशेष उत्साह दिसून येत नव्हता. त्यात वाढलेल्या फुलांच्या दराचाही परिणाम झाल्याचे जाणवत होते.

झेंडूचा दर बहरला; परतीचा पावसाचा ग्राहकांना फटका

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : विजयादशमी दसरा व दिवाळी लक्ष्मीपूजन म्हटले की पूजेसाठी झेंडूच्या फुलांना अग्रक्रमांक असतो. मात्र आवक घटल्याने झेंडूच्या फुलांचा दर वधारला असून ऐन सणाला झेंडूची फुले दराने फुलली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे यावर्षी झेंडूच्या हारा ऐवजी केवळ फुलांनाच पसंती मिळालयाचे दिसून आले.

यंदा पाऊस व कोरोना मुळे फुलांना मार्केट मिळाले नाही. अनेकांना आपली फुले कवडीमोल दराने विकण्याची तर काहींना रानातच टाकून देण्याची वेळ अनेकदा आली. यामुळे झेंडू फुलांची लागवडच कमी झाली होती. जी होती ती परतीच्या मुसळधार पावसाने वाहून गेली होते. परिणामी झेंडूची आवक घटली. घटलेल्या आवकमुळे दराने मात्र उच्चांक केला आहे.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा


शनिवारी (ता.24) रात्री शंभर रुपये किलोवर असलेला दर आज (रविवार) सकाळी दोनशे तर दहा वाजता चारशे रुपयांवर गेल्याचे पहावयास मिळाले. आणखी दोन तासाने तारळे बाजारपेठमध्ये फुले देखील मिळेनाशी झाली. अनेकांना फुले देखील मिळू शकली नाहीत. या वाढलेल्या दरामुळे व्यापारी वर्गाने हार न बनविता केवळ फुले वाहून पूजा संपन्न केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत साजरा होत असलेल्या दसऱ्याला विशेष उत्साह दिसून येत नव्हता. त्यात वाढलेल्या फुलांच्या दराचाही परिणाम झाल्याचे जाणवत होते. शिवाय साडे तीन मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदीसाठी देखील पाठ फिरविल्याचे चित्र बाजारपेठेत होते. फक्त झेंडू मात्र दराने बहरला होता.

‘करू दे तो हत्ती पिकाची नुकसान ; हेलपाट्यांनी जीव घायकुतीला 

खंडाळा तालुक्यात देखील आज झेंडुची फुलांचा हार 350 ते 250 रुपयांना मिळत हाेता. काही गावांत तर फुलांचा तुटवडा जाणवला. याबराेबरच मागणीप्रमाणे हार उपलब्ध हाेत नव्हते. सातारा शहरात देखील आज (रविवार) झेंडू फुलाचे दर 600 ते 400 रुपये किलोपर्यंत पाेहचले. तसेच हार 200 रुपयांपर्यंत मिळत हाेता.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top