esakal | जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी
sakal

बोलून बातमी शोधा

जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्‍यातील क्रांतिकारक आपल्यासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असतानाच पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचीही जन्मशताब्दी सुरू आहे. अण्णांनी सातारा (satara) जेल फोडून ब्रिटिश व्यवस्थेला धक्का दिला होता. हा प्रसंग आपल्यासाठी अभिमानास्पद आणि आदर्शवत असा हा प्रसंग असल्‍याचे वाळवा येथील हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी आज येथे सांगितले.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींना ब्रिटिशांनी कैद करून सातारा जेलमध्ये ठेवले होते. या जेलच्‍या भिंतीवरून ता. १० सप्टेंबर १९४४ रोजी उडी मारून अण्‍णा पुन्‍हा भूमिगत झाले होते. त्‍या घटनेला आज ७७ वर्षे पूर्ण होत असल्‍याने वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखाना, हुतात्मा शिक्षण संकुल, हुतात्मा परिवाराच्या वतीने सातारा येथे ‘जेलफोडो शौर्य दिन’ साजरा करण्‍यात आला.

या कार्यक्रमास ‘रयत’चे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी, वीरधवल नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‍उपस्थितांनी जेल परिसरातील हुतात्‍मा स्‍तंभास अभिवादन केले. या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विजय असो, प्रतिसरकारचा विजय असो, पद्मभूषण नागनाथअण्णा झिंदाबाद, क्रांतिसिंह नाना पाटील झिंदाबाद, हुतात्मा किसन अहिर झिंदाबाद, हुतात्मा नानकसिंग झिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्‍यात आला.

हेही वाचा: न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

या वेळी डॉ. अनिल पाटील, अजय कुमार बन्‍सल यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. बी. के. नायकवडी, विजय मांडके यांचीही या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमास गणेश दुबळे, सुनेत्रा भद्रे, भगवानराव पाटील, बाळासाहेब पाटील, प्रा. विलास ढगे, अजित वाझे, संभाजीराव थोरात, दादासाहेब चव्हाण, सुभाष मोटे, आनंदराव सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील, प्रदीप पवार, रमेश आचरे, प्रा. हसीम वलांडकर, जयकर चव्हाण, पोपट फाटक, आनंदराव चव्हाण, दत्ता जाधव, शरद खोत, अरुण यादव आदी उपस्थित होते.

-गिरीश चव्हाण

loading image
go to top