esakal | बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं 'लसीकरण'; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका
sakal

बोलून बातमी शोधा

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं 'लसीकरण'; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे.

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं 'लसीकरण'; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सर्व भारतीयांना कोरोना विरोधी लस रास्त आणि न्याय पद्धतीने देण्याचे नियोजन करण्याऐवजी भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात लसीचे राजकारण केले आहे. महामारीच्या काळातसुद्धा राजकीय फायद्याकरिता एका राज्याला विशेष वागणूक देणे पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर आणि अमानुष आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात कोरोनाची लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे. 

Bihar Election : भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर चौफेर टीका; थरूर यांनी उडवली खिल्ली

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, भाजपने बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात कोरोना लसीचे राजकारण केले आहे. महामारीच्या काळातही राजकीय फायद्याकरिता एका राज्याला विशेष वागणूक देणे पूर्णपणे बेकायदेशीर व अन्यायकारक, अमानुष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने सर्व राज्यात कोरोना विरोधी लस रास्त आणि न्याय पद्धतीने देण्याचे नियोजन करायला हवे होते. मात्र, त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोरोना लसीचे राजकारण सुरू केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे