
सातारा : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची सर्व माहिती केंद्र सरकारने सर्व देशाला विश्वासात घेऊन तसेच सर्व विरोधी पक्षाला नेमकी परिस्थिती सांगण्यासाठी उशिरा का होईना केंद्रीय नेतृत्वाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, पाकिस्तानसोबतचे युद्ध आपण जिंकले असेल, तर जगातील एकही देश आपल्या मागे का नाही, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री यांनी द्यावे, युद्ध करण्यापूर्वी पाकिस्तानला पूर्वसूचना दिली होती का, याचाही खुलासा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.