शेतीचे नुकसान पाहून पृथ्वीराज चव्हाणांचे मन हेलावले

शेतीचे नुकसान पाहून पृथ्वीराज चव्हाणांचे मन हेलावले
Updated on

क-हाड : क-हाड दक्षिणमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची रविवारी दिवसभर ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कर्मचारी तसेच मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण तसेच पाचवड गावचे शेतकरी उपस्थित होते. 

शेतीचे झालेले नुकसान पाहून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मन हेलावले. बहुतांश शेतक-यांनी तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आमदार चव्हाण यांनी शेतक-यांना दिलासा दिला. क-हाड दक्षिणमधील अतिवृष्टीने बाधित जवळपास सर्व क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. काही पंचनामे राहिले आहेत का हे तपासून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. लवकरात लवकर तुम्हांला अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल असे आश्वासित केले.

सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे; उदयनराजेंचा बेधडक आराेप

त्याचबरोबर अतिवृष्टीने कुठे रस्ता व पूल खचले आहेत का याचीसुद्धा पाहणी आमदार चव्हाण यांनी केली व त्यानुसार अहवाल लवकरात लवकर बनवून शासनाकडे पाठवावा अश्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill
Satara Mahimangad Fort conservation project
Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Swimming Trip Ends in Tragedy: Young Boy Dies After Drowning in Karad
Marathi News Esakal
www.esakal.com