Malkapur Accident : मलकापूरनजीक अपघातात तिघे जखमी; क्रेनने नेण्यात येणाऱ्या मोटारीला खासगी बसची धडक

कोल्हापूर- सातारा मार्गिकेवरून कऱ्हाडकडे येताना रात्री दीडच्या सुमारास येथील डी- मार्टजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या खासगी आराम बसने मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटार क्रेनवर आदळली. त्यात मोटारीचे नुकसान झाले.
Scene from Malkapur accident where a private bus collided with a car being towed, injuring three people.
Scene from Malkapur accident where a private bus collided with a car being towed, injuring three people.Sakal
Updated on

मलकापूर : बंद पडलेली मोटार क्रेनद्वारे शोरूमला घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या खासगी बसने मोटारीला धडक दिली. येथील डी-मार्टसमोर काल रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात तिघेजण जखमी झाले. सचिन गणपत रवले (रा. मालचौंडी, ता. जावळी) यांनी त्याबाबत कऱ्हाड शहर पोलिसात तक्रार दिली आहे. अंकिता सचिन रवले, वेदांत सचिन रवले व प्रज्ञा राजेश कदम अशी जखमींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com