साताऱ्यात खासगी रुग्णालयांचा कोरोनाबाधितांवर उपचारास नकार; प्रशासन ढिम्म

साताऱ्यात खासगी रुग्णालयांचा कोरोनाबाधितांवर उपचारास नकार; प्रशासन ढिम्म

सातारा : कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळत नसताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी रुग्णालये कोरोनाबाधितांवर या योजनेंतर्गत उपचार करत आहेत. नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठी शासकीय योजनेतून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
 
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची बाधा वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दरररोज चारशेपर्यंत नागरिक कोरोनाबाधित सापडत आहेत. बाधितांचे प्रमाण वाढत असताना गंभीर होणाऱ्या रुग्णांची संख्याही त्याच पटीत समोर येत आहे. परंतु, वाढत्या बाधितांच्या संख्येला योग्य उपचार देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आत्तापर्यंत तब्बल 324 नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून करण्यात आलेली एकूण बेडची व्यवस्था अत्यंत तोकडी पडत आहे. शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन बाधितांना आवश्‍यक त्या सुविधांनी युक्त असलेला बेड मिळत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आवश्‍यक बेडची व्यवस्था करण्यासाठी कशाची वाट पाहात आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून कोरोना संशयितांची चाचणी करा : रामराजे निंबाळकर
 
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय योजनेतून उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील आत्तापर्यंत केवळ दहाच रुग्णालयांत सुविधा आहे. वास्तविक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची संख्या त्याहून किती तरी जास्त आहे. त्यातील एकूण 27 रुग्णालये अन्य उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नही आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्‍यात चार, कऱ्हाडमध्ये पाच, कोरेगावमध्ये दोन, फलटणमध्ये तीन, खंडाळा, वाई, माणमध्ये प्रत्येकी दोन तर, वडूजमध्ये एक रुग्णालय आहे. परंतु, ही सर्व रुग्णालयेही कोरोनाबाधितांवर या योजनतून उपचार होण्यासाठी उपलब्ध झालेली नाहीत.

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना 
 
अनेक रुग्णालयांना शासकीय योजनेतून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्याला नकार दिल्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. नकार देणारी हीच रुग्णालये पैसे असणाऱ्यांसाठी आपल्या पद्धतीने पैशांची आकारणी करून कोरोनावर उपचार करत आहेत. दररोज मृत्यूच्या दारात जाणाऱ्या नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कठोर निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 

धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सिंचन विभागास यश 


केवळ सहा ठिकाणीच उपचाराची सोय 

सध्या कऱ्हाडमध्ये तीन, वाईत दोन, साताऱ्यात दोन तर, खंडाळ्यात एक खासगी हॉस्पिटल कोरोनाबाधितांवर उपचारासाठी योजनेत समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त बेल एअर (पाचगणी) व मायणी मेडिकल कॉलेज एवढ्याच ठिकाणी बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यामुळे इतर रुग्णालये अन्य आजारांसाठी आहेत, मग कोरोनासाठी का नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com