
नागरिकांनी सकाळपासून ते संध्याकाळ नऊपर्यंत सोशल डिस्टन्स ठेऊन दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मसूर (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किवळ (ता. कऱ्हाड) येथील त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने रविवारी (ता. 29) भरणारी संत नावजीनाथ देवाची यात्रा व रथाची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. संत नावजीनाथ देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, देवस्थान समितीचे अध्यक्ष भानुदास साळुंखे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. विजय साळुंखे, देवस्थान समितीचे सचिव रामराव साळुंखे, माणिकराव साळुंखे, शंकर साळुंखे, पोपटराव साळुंखे, मनोज फल्ले, मनोज नलवडे उपस्थित होते. तमाशा कार्यक्रम, कुस्ती मैदान, सांस्कृतिक कार्यक्रम, रथाची मिरवणूक रद्द करण्यात आली.
खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली
नावजीनाथ मंदिराशेजारील मैदानात रथ उभा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व मास्कचा वापर करूनच रथाचे दर्शन घेता येईल. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत रथपूजन होईल. संत नावजीनाथ व श्री ज्योतिर्लिंग मंदिरात नागरिकांनी सकाळपासून ते संध्याकाळ नऊपर्यंत सोशल डिस्टन्स ठेऊन दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar