Satara Crime : गाळा तोडफोडप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
Property Damage Case : जाधव यांचा गाळा करार करून भाड्याने घेतला होता. ३१ मार्चपर्यंत त्यांच्या कराराची मुदत होती. या दरम्यान २७ फेब्रुवारीला जाधव यांनी सोळवंडे यांना गाळा खाली करण्याबाबतची नोटीस दिली होती.
Five Accused in Shop Ransacking Incident; Police Investigation UnderwaySakal
सातारा : पोवई नाक्यावरील बालाजी प्रेस्टीज या इमारतीमधील गाळ्यात शिरून साहित्याची नासधूस करून कपाटाच्या ड्रॉव्हरमधील पाच हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.