
मलकापूर: महामार्गाच्या सहापदरीकरण कामामुळे पाचवड फाटा व नारायणवाडी परिसरात शेतात पाणी साचून राहिल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार डॉ. भोसले यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.