
सातारा : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा निषेध असो, माणिकराव कोकाटे हाय हाय.., अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदवला, तसेच त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यासोबतच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.