पाटण रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करा : खासदार श्रीनिवास पाटील

अरुण गुरव
Saturday, 12 September 2020

ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी असून, त्यामुळे कोरोनाकाळात रुग्णालयावर जास्त ताण पडत आहे. रुग्णालयाची 108 ची गाडी कोविडला दिल्याने स्थानिक रुग्णांना बाहेर ठिकाणी घेऊन जाताना व आणताना अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांची व विविध विभागांतील संख्या कमी असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार होत नाहीत यांसह इतर गैरसोयींबद्दल माहिती देऊन त्या सोडविण्याची मागणी राजाभाऊ काळे यांनी केली.

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन मराठा-बहुजन क्रांती मोर्चा, सामाजिक ऐक्‍य परिषदेच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना पाटण ग्रामीण रुग्णालयासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

मराठा-बहुजन क्रांती मोर्चा व सामाजिक ऐक्‍य परिषदेतर्फे आंदोलनादरम्यान समस्यांचे निवेदन खासदार पाटील यांनाही दिलेले होते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. चव्हाण यांनी पाटण ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील समस्यांची माहिती घेऊन या ठिकाणच्या गैरसोयी दूर करण्याबाबत ठोस आश्‍वासन दिले. या वेळी मराठा-बहुजन क्रांती मोर्चाचे समन्वयक राजाभाऊ काळे, यशवंतराव जगताप, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव व पत्रकार उपस्थित होते. 

वेणूताई चव्हाण रुग्णालयातील सर्व 45 बेड तातडीने सुरु करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी असून, त्यामुळे कोरोनाकाळात रुग्णालयावर जास्त ताण पडत आहे. रुग्णालयाची 108 ची गाडी कोविडला दिल्याने स्थानिक रुग्णांना बाहेर ठिकाणी घेऊन जाताना व आणताना अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांची व विविध विभागांतील संख्या कमी असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार होत नाहीत यांसह इतर गैरसोयींबद्दल माहिती देऊन त्या सोडविण्याची मागणी राजाभाऊ काळे यांनी केली. यावर डॉ. चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेऊन येथील अडचणी लवकरच सोडविल्या जातील, असे सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide Facilities At Patan Rural Hospital Satara News