Pune Bengaluru Highway: टोल भरूनही खड्डेमय प्रवास! पुणे-बंगळूर महामार्गावर पावसामुळे सेवा रस्त्यांची दुरवस्था, अपघाताचा धोका

Pune Bangalore Highway Potholes Raise Accident Risk: टोल वसुली सुरू, पण सेवा रस्त्यांची दुरवस्था कायम; खड्डे, साचलेले पाणी, सांडपाणी आणि अवजड वाहतुकीमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातांचा धोका टोकाला
Pune Bangalore Highway Service Roads Turn Dangerous With Potholes Waterlogging And Accident Risk Amid Heavy Rainfall

Pune Bangalore Highway Service Roads Turn Dangerous With Potholes Waterlogging And Accident Risk Amid Heavy Rainfall

sakal

Updated on

कऱ्हाड : जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे, तर जेथे महामार्गाच्या कामामुळे सेवा रस्त्यांवरून वाहतूक वळवली आहे, त्या परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही ठिकाणे मोठ्या धोक्‍याची घंटा वाजवत असतानाही त्‍याकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एवढेच नव्‍हे, तर अशा जीवघेण्‍या खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ये-जा करण्‍यासाठी टोलचा नाहक भुर्दंड सोसावा लागतो आहे, हे तर अत्‍यंतच संतापजनक असल्‍याच्‍या प्रतिक्रियाही व्‍यक्‍त होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com