हृदयविकाराचा धक्का येऊनही एसटी चालकाने वाचविले 31 प्रवाशांचे प्राण; पुणे-बंगळूर महामार्गावर थरार

एसटी चालवत (ST Driver) असतानाच चालकाला हृदयविकाराचा (Heart Attack) धक्का बसला.
Pune-Bangalore National Highway ST Driver
Pune-Bangalore National Highway ST Driveresakal
Summary

महामार्गावर वारुंजीच्या हद्दीत चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घातली.

कऱ्हाड : एसटी चालवत (ST Driver) असतानाच चालकाला हृदयविकाराचा (Heart Attack) धक्का बसला. मात्र, त्यातही प्रसंगावधान दाखवत चालकाने एसटी दुभाजकावर घालून गाडी थांबवली आणि ३१ प्रवासांचे प्राण वाचविले. मात्र, उपचारावेळी चालकाचा मृत्यू झाला.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) वारुंजीच्या हद्दीत काल सायंकाळी ही घटना घडली. राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे या एसटी चालकाचे नाव आहे. विटा आगाराची विटा ते स्वारगेट एसटी घेऊन चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख कडेगावमार्गे आले. कऱ्हाड बस स्थानकातून एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत ३१ प्रवासी होते.

Pune-Bangalore National Highway ST Driver
Sangli Municipal Corporation : सांगली महापालिकेला तब्बल नव्वद कोटींचा दंड; काय आहे प्रकरण?

महामार्गावर वारुंजीच्या हद्दीत चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घातली. त्यामुळे एसटी तेथेच थांबली. एसटी थांबल्यामुळे वाहक शेख केबीनजवळ गेले. त्यावेळी चालक बुधावले यांना प्रचंड घाम आला होता. चक्कर येत असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे वाहक शेख यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या एसटीत बसवले.

Pune-Bangalore National Highway ST Driver
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांबरोबर..

चालक बुधावले यांना रिक्षातून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच बुधावले यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या बुधावलेंच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. एसटी वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी शहर पोलिसात त्याची फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com