Pune–Bengaluru Highway
esakal
कऱ्हाड : पुणे-बंगळूर महामार्गादरम्यानच्या (Pune–Bengaluru Highway) सातारा तालुक्यातील नागठाणे ते कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा दरम्यान अनेक ठिकाणी उड्डापुलाची उभारणी, रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे सातत्याने ठिकठिकाणी वाहतूक जाम होत आहे. ऐन दिवाळीची सुट्टी संपवून कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.