
सातारा: सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजिलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती करंडक योनेक्स सनराईज राज्य वरिष्ठ गट बॅडमिंटन निवड स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत पुण्याच्या वरुण कपूर, तारा शहाने विजेतेपदाचा मान मिळविला, तर दुहेरीत पुरुषांत पुण्यातील आर्य व ध्रुव ठाकोरेने, तसेच महिलांत ठाण्याच्या अनघा करंदीकर व सिया सिंगने, तसेच मिश्र दुहेरीत अमन फारोघ संजय व अनघा करंदीकर यांनी विजेतेपद पटकाविले.